औरंगाबाद- बाबरी मशिदीचे ६ डिसेंबर रोजी पतन करण्यात आले होते. तेंव्हापासून शिवसेना भाजप व हिंदुत्ववादी संघटना कडून शौर्य दिन पाळला जातो. याच निमित्ताने गुलमंडी येथील सुपारी मारोती मंदिरात शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. तर औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाजपच्या वतीने आरती करण्यात आली.
गुलमंडी येथील
सुपारी मारोती मंदिरात शिवसेनेच्या वतीने आयोजित महाआरती चे आयोजन करण्यात
आले होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोंनगावकर, महापौर, नंदकुमार घोडले, विकास जैन, बंडू ओक, सुगंधकुमार गडवे
चंद्रकांत इंगळे नगर सेवक सचिन खैरे सह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणा शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या.
तर भाजप शहर
कार्यकारिणीच्या वयीने औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी आमदार अतुल सावे, जिल्हा अध्यक्ष
किशनचंद तनवाणी, भागवत कराड, शिरीष बोराळकर, अनिल मक्रिये, कैलास पुसे सह
मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.












